गोव्यात प्रभु श्रीरामाविषयी मुसलमानाकडून सामाजिक माध्यमातून अश्लील माहिती प्रसारित !

धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कारवाई होणार आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. गोवा राज्य धार्मिक सलोखा आणि शांतता यांसाठी प्रसिद्ध आहे अन् गोव्याची ही ओळख पुसण्याचा कुणीही प्रयत्न करू नये –  मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोवा : समुद्रकिनारपट्टीवर पुन्हा रात्रभर चालणार्‍या पार्ट्यांच्या माध्यमातून ध्वनीप्रदूषण

पोलिसांना हे ऐकू येत नाही कि त्यांचे ध्वनीप्रदूषण करणार्‍यांशी साटेलोटे आहे ?

पावसाने झोडपले : नद्यांना उधाण, कोकण रेल्वे सेवा ठप्प

गोवा राज्यात आणि शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सलग दुसर्‍या दिवशीही चालूच होता. जोरदार वारे आणि पाऊस यांच्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. संक्षिप्त वृत्तांत देत आहोत.

गोवा : केरी तपासणी नाक्यावर ११ लाख रुपये किमतीचे गोमांस कह्यात

पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी सय्यद इस्माईल मरचोनी (रहाणारा पेडणे) याला कह्यात घेतले आहे. कह्यात घेतलेल्या गोमांसाची किंमत अंदाजे ११ लाख रुपये आहे. गोरक्षकांना मिळते ती माहिती पोलिसांना मिळत नाही का ?

प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विरोधात सामाजिक माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचे गोवाभर तीव्र पडसाद

संशयिताला त्वरित कह्यात घेण्याची मागणी मडगाव, फोंडा आणि म्हापसा येथे मुसलमानांनी संबंधित पोलिसांकडे केली आहे. मडगाव येथील दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात मुसलमानांनी ‘जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही’, असा पवित्रा घेतला आहे.

गोव्यात एप्रिल २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील सर्व राजकीय पक्षांशी बैठक घेतल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला भाजप, काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्ड या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गोव्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत !

गोव्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने अतीवृष्टीची चेतावणी दिल्याने प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. कुशावती, म्हादई आदी नद्या दुथडी भरून वहात आहेत.

पाणी प्रदूषित झाल्याने मडगाव (गोवा) येथील पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जनस्थळ पालटले ! Ganesh Visarjan

प्रदूषित पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन न करता मूर्तीचे पावित्र्य टिकवणार्‍या पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा !

गोवा : देवीची मूर्ती स्थापन करणार्‍या दोघांना अटकपूर्व जामीन संमत

वारसा स्थळी अनेक दशकांपूर्वी १२ व्या शतकातील श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती आढळली होती. ही मूर्ती सध्या ‘ए.एस्.आय.’च्या वस्तूसंग्रहालयामध्ये उपलब्ध आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वारसा स्थळी या मूर्तीची स्थापना करावी.

वादळी वार्‍यासह पावसाने गोव्याला झोडपले : जनजीवन विस्कळीत !

अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडल्याने संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित ! दक्षिण कोकण आणि गोव्याची किनारपट्टी या भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने १ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे.