आजपासून कोल्हापूर येथील शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ !

कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचा शारदीय नवरात्रोत्सव ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने ‘श्री करवीर निवासीनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्री पूजक मंडळा’च्या वतीने देवीच्या विविध अलंकार पूजा बांधण्यात येणार आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

३ ऑक्टोबर या दिवशी सिंहारूढ महालक्ष्मी (घटस्थापना), ४ ऑक्टोबर या दिवशी गजेंद्रलक्ष्मी, ५ ऑक्टोबर या दिवशी-चंद्रलांबा परमेश्वरी, ६ ऑक्टोबर या दिवशी गायत्रीमाता, ७ ऑक्टोबर या दिवशी सरस्वतीदेवी, ८ ऑक्टोबर या दिवशी- गजारूढ अंबारीतील (पंचमी- त्र्यंबोली भेट), ९ ऑक्टोबर या दिवशी महाप्रत्यंगिरा, १० ऑक्टोबर या दिवशी – दुर्गा माता, ११ ऑक्टोबर या दिवशी – महिषासुरमर्दिनी (अष्टमी – नगर प्रदक्षिणा), तर १२ ऑक्टोबर या दिवशी रथारूढ (नवमी + दसरा सीमोल्लंघन) रूपात पूजा बांधण्यात येणार आहे.