पाणी प्रदूषित झाल्याने मडगाव (गोवा) येथील पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जनस्थळ पालटले ! Ganesh Visarjan

(Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)

पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मडगाव गोवा

मडगाव, २९ सप्टेंबर (वार्ता.) : येथील पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्रींच्या मूर्तीचे विसर्जन २९ सप्टेंबर या दिवशी खारेबांध येथे करण्याऐवजी फातोर्डा येथील दामोदर तळी येथे केले. खारेबांध येथील तळ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याने मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आदेश कारवारकर प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘मंडळाने स्थानिक आमदार दिगंबर कामत यांच्या उपस्थित नुकतेच खारेबांध येथील तळ्याचे निरीक्षण केले असता आम्हाला तेथील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे आणि आसपासचा परिसर अस्वच्छ असल्याचे जाणवले. पुढील श्री गणेशचतुर्थीपर्यंत खारेबांध येथील तळे स्वच्छ करणार असल्याचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले आहे.’’ या दृष्टीने जांबावली येथे श्री दामोदराकडे कौलप्रसादही घेतल्याचे मंडळाने सांगितले.

क्लिक करा → Pimpalkatta mandal shifts immersion to Fatorda pond

संपादकीय भूमिका

प्रदूषित पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन न करता मूर्तीचे पावित्र्य टिकवणार्‍या पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा !