एम्.आय.एम्.चे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा नोंदवा !

निफाड येथे पोलिसांना निवेदन !

पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना हिंदू धर्माभिमानी

नाशिक – संभाजीनगर ते जालना येथे एम्.आय.एम्.चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काढलेल्या रॅलीच्या काळात रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या छत्रपती संभाजीनगर फलकांवर धर्मांधांनी काळे फासले. या प्रकरणी सकल हिंदू समाज, निफाड आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने इम्तियाज जलील आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरव यांना देण्यात आले. या वेळी १०० हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते.