श्रीराम आणि श्रीकृष्ण समजून घेतल्यास समर्थ भारत घडेल ! – शरद पोंक्षे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ अभिनेते 

जगातील सर्व देश महासत्ता होण्यासाठी धडपडतात; परंतु एकमेव भारत देश ‘विश्वगुरु’ होण्यासाठी धडपडत आहे. शस्त्रांच्या आधारावर महासत्ता बनता येऊ शकते; मात्र ‘विश्वगुरु’ होण्यासाठी संस्कार आणि सनातन संस्कृती लागते.

पावसाळ्यापूर्वीच परशुराम घाटातील महामार्गाचे काम पूर्ण करून दुतर्फा वाहतूक चालू होण्याची शक्यता !

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट दिवसातील ५ घंटे वाहसुकीस बंद ठेवल्याने चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. या घाटातील जुन्या रस्त्यावर भराव टाकून तो बुजवण्याचे काम चालू करण्यात आले आहे.

खाणींसाठी नव्याने पर्यावरण दाखला घेण्याचा गोवा खंडपिठाचा आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नव्याने पर्यावरण दाखला घेण्यास सांगितले आहे. ‘सोसीयेदाद-द-फॉमेंतो’ यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर गोवा खंडपिठाने हा निर्णय दिला.

राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास गोवा सज्ज !

३७ व्या राष्ट्रीय खेळांच्या आयोजनासाठी गोवा सज्ज आहे. या स्पर्धांसाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा आधीच सिद्ध आहेत. राहिलेली किरकोळ कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण होतील, असे गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करणारे गोवा हे पहिले राज्य असेल ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्र्यांनी ‘गुरुकुल विश्व ॲप’चे लोकार्पण केले. या ॲपमुळे पूर्वप्राथमिक शाळांची नोंदणी करणे सुविधाजनक तसेच ऑनलाईन नोंदणीद्वारे पूर्वप्राथमिक शाळांना अनुमती देणे सहज शक्य होणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयाची वाट पहाणार ! – पी.टी. उषा, अध्यक्षा, भारतीय ऑलिंपिक संघटना

गोवा भेटीवर असलेल्या भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा यांना पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘याविषयी केंद्र सरकारच्या निर्णयाची वाट पाहू. केंद्राने यासाठी एक समिती स्थापन केली आहे.

गोव्यात वर्ष २०१४ पासून १०२ सरकारी प्राथमिक शाळा बंद

वर्ष १९७८ पासून मागील ३५ वर्षांत ३८४ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. शासकीय माहितीनुसार वर्ष २०१४ मध्ये राज्यात ८२२ सरकारी प्राथमिक शाळा होत्या.

गोवा : काणकोण मामलेदार कार्यालयातील आगीत अनेक जुनी कागदपत्रे जळून खाक

राज्यात हल्लीच अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. भूमी बळकावल्याची प्रकरणे आणि आग दुर्घटना यांचा काही संबंध आहे का ? याचे अन्वेषण करण्याची मागणी होत आहे.

गोवा : गोसेवक तथा शेतकरी कार्यकर्ता हनुमंत परब यांचे नाव पोलिसांच्या गुन्हेगारी सूचीतून वगळा !

गुन्हेगारी सूचीत त्यांचे नाव समाविष्ट करण्याची कृती ही त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे आणि हे दु:खद आहे. श्री. हनुमंत परब यांनी मागील अनेक वर्षे समाजात जे चांगले कार्य केले आहे, त्या कार्याचा हा अवमान आहे.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या गोव्यासह ४ राज्यांमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या  ठिकाणांवर धाडी

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) या कारवाईत कुर्टी येथील नुरानी नागा मशिदीत पूर्वी इमाम म्हणून कार्यरत असलेला मुफ्ती हनिफ महंमद एहरार याला कह्यात घेतले आहे. ही कारवाई कडक पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.