पुणे शहरातील अयोग्य पद्धतीने दुकान मांडणार्‍या २२६ श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांना नोटीस !

रस्त्यावर आणि पादचारी मार्गांवर श्री गणेशमूर्ती विक्रीची दुकाने मांडली जातात, त्यामुळे वाहतूककोंडी होते. अशा २२६ विक्रेत्यांना महापालिकेने नोटीस दिली आहे. यामध्ये सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक ३४ नोटिसा दिल्या आहेत.

प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय सांगणार्‍या समितीचा दीड वर्षे अहवालच नाही !

महापालिका मूर्तीकारांवरील गुन्हे मागे घेणार का ? गुन्हे मागे न घेतल्यामुळे मूर्तीकारांचे खच्चीकरण होणार आणि भक्तांचीही गैरसोय होणार ! त्यांच्यासाठी ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती यामुळे निर्माण झाली आहे. 

पनवेल येथे ‘पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती विक्री केंद्र’ चालू !

गिरीधर मूर्ती प्रशिक्षण आणि कलाकेंद्र, श्री गणेश कलाकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्तीकारांनी सिद्ध केलेल्या मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

पेणहून २ लाख श्री गणेशमूर्ती परदेशात

इंग्लंड, अमेरिका,  आदी अनेक देशांमध्ये गणेशमूर्ती पाठवल्या जातात. यंदा युएई आणि सिंगापूर येथेही मूर्तींची मागणी आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती आयात होणार नाहीत, याकडे लक्ष ठेवा ! – आमदार विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्ड

राज्याबाहेरून येणार्‍या श्री गणेशमूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आहेत कि नाहीत ? हे शोधून काढण्यासाठी मूर्तींचा उत्पादक कोण ? त्या कोठून आल्या ? पुरवठादार कोण ? वाहतूक करणार्‍या वाहनाचा क्रमांक आदी सर्व माहितींची नोंद ठेवावी.

सनातन-निर्मित सात्त्विक मूर्तीच्या संगणकीय त्रिमितीकरणाच्या सेवेत सहभागी व्हा !

आधुनिक विज्ञानाचा उपयोग सात्त्विक कलाकृतीच्या निर्मितीसाठी करणे आणि अधिकाधिक लोकांना या मूर्तीचा लाभ करून घेता यावा, या उद्देशांनी या मूर्तीची संगणकीय त्रिमितीय रचना करण्याचे नियोजिले आहे. त्यासाठी ‘ब्लेंडर’, ‘झेड्ब्रश’ अशा संगणकीय प्रणालींचे (‘सॉफ्टवेअर’चे) ज्ञान असणे आवश्यक आहे.

Ganeshotsav 2024 : नाशिक येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सिद्ध करणार्‍या ७ मूर्तीकारांवर कारवाई !

मूर्तीकारांना शाडूची माती मुबलक प्रमाणात उपलब्ध करून न देता मूर्तीकारांवर थेट कारवाई करणे कितपत योग्य ?

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची राज्याच्या सीमांवर कठोर तपासणी करणार

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीच्या विक्रीवर गोव्यात बंदी आहे. या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीची गोव्यात आयात रोखण्यासाठी राज्याच्या सीमांवर कठोर तपासणी करण्याचे निर्देश पोलीस खात्याला देणार आहे

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ गणेशमूर्तीच्या निर्मितीवर कडक बंदी घाला !

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (‘पीओपी’) गणेशमूर्ती निर्मिती बंदीच्या कडक कार्यवाहीसाठी मुंबई उच्च न्यायालयात १२ याचिकाकर्त्यांनी जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. यामध्ये ९ मूर्तीकार आणि ३ पर्यावरणवादी कार्यकर्ते आहे.

नागपूर येथे ‘इकोफ्रेंडली’ गणेशमूर्तीसाठी प्रदूषण मंडळाचे ‘इको बाप्पा ॲप’ !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने इकोफ्रेंडली (पर्यावरणपूरक) गणेशमूर्ती सिद्ध करणार्‍या मूर्तीकारांसाठी ‘इको बाप्पा ॲप’ सिद्ध केले आहे. चिकणमाती, कागदाचा लगदा, हळद, नारळ, कच्ची केळी, सुपारी आदींपासून गणेशमूर्ती घडवल्या जातात.