Narendra Modi : काँग्रेसकडून हिंदूंची श्रद्धा आणि संस्कृती यांचा वारंवार अपमान ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
काँग्रेसने नेहमीच आमची श्रद्धा आणि संस्कृती यांचा अपमान केला आहे. काँग्रेसवाल्यांनी तर कर्नाटकमध्ये गणपतिबाप्पालाही थेट कारागृहात टाकले होते. काही लोकांकडून पूजली जाणारी श्री गणेशमूर्ती काँग्रेसींनी पोलीस ज्या वाहनातून आरोपींना नेतात, त्या वाहनातून पोलीस ठाण्यात नेली.