Nagmangal Rioters From Bangladesh : नागमंगल (कर्नाटक) येथील दंगलीत घुसखोर बांगलादेशी मुसलमानांचा हात !  

भाजपचे आमदार सुरेश गौडा यांचा आरोप

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत घुसखोर बांगलादेशी

मंड्या (कर्नाटक) – येथील नागमंगल भागात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळी झालेल्या दंगलीत घुसखोर बांगलादेशी मुसलमानांचा हात आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुरेश गौडा यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

ते पुढे म्हणाले की, नागमंगल येथे बांगलादेशी घुसखोर मुसलमान स्थायिक झाले आहेत.

सुरेश गौडा

आमच्याकडून (हिंदूंकडून) कुणीही या दंगलीत सहभागी झाले नव्हते. हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्.आय.ए.कडे) सोपवले असून लवकरच सत्य समोर येईल.

संपादकीय भूमिका

  • जर हे सत्य असेल, तर भविष्यात हिंदूंना देशभरात अशाच दंगलींना सामोरे जावे लागणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
  • केंद्रातील भाजप सरकारने आता तरी देशभरातील घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, असेच राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !