भटक्या कुत्र्यांनी अवशेष आणून टाकल्याचे पोलीस अन्वेषणात उघड
शाहपुरा (राजस्थान) – येथे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले त्या तलावाबाहेरच मृत शेळीचे अवशेष आढळून आल्यानंतर हिंदु संघटनांकडून येथे आंदोलन करण्यात आले. कुणीतरी मुद्दामहून हे अवशेष टाकल्याचा आरोप या संघटनांनी केला.
शाहपुराचे पोलीस अधीक्षक राजेश कवंत यांनी सांगितले की, गणपति मंडपाजवळ प्राण्याचे अवशेष मिळाल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी पथक पाठवले. अन्वेषण करत असतांना सीसीटीव्ही तपासण्यात आले. तेव्हा भटक्या कुत्र्यांनी मृत पावलेल्या शेळीचे लचके तोडल्याचे दिसले. याच भटक्या कुत्र्यांनी शेळीचे अवशेष गणपति मंडपासमोर असलेल्या तलावाजवळ टाकले होते. ही माहिती आम्ही आंदोलन करणार्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.