ISIS On Afghan Cricket : क्रिकेटमधील विजयाचा आनंद साजरा करणार्‍या अफगाणिस्तान सरकारवर आतंकवादी संतप्त !

इस्लामिक स्टेट खोरासानचे तालिबानविरुद्ध युद्ध !

Maldives Invites Indian Cricket Team : विश्‍वविजेत्‍या भारतीय क्रिकेट संघाला मालदीवला भेट देण्‍याचे निमंत्रण !

चीनच्‍या तालावर नाचणार्‍या मालदीववर भारतीय पर्यटकांनी बहिष्‍कार घातल्‍यामुळे त्‍याचे धाबे दणाणले असून त्‍याला उपरती झाली आहे, हेच यातून दिसून येते !

Indian Vs Chinese Soldiers : रस्सीखेच स्पर्धेत भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना केले पराभूत !

या स्पर्धेमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांच्या शारीरिक कौशल्याची आणि सांघिक कामगिरीचीही चाचणी घेण्यात आली.

Cricket Betting Booming In Goa : क्रिकेटवरील सट्टेबाजीचा व्यवसाय गोव्यात तेजीत !

क्रिकेटवर सट्टेबाजी करणारे व्यावसायिक प्रथम त्यांचे एक ॲप ग्राहकांना ‘शेअर’ करतात आणि याद्वारे ग्राहकाला त्याचा ‘आय.डी.’ दिला जातो. या ‘ॲप’च्या माध्यमातून दोघांची पैशांची देवाणघेवाण चालू होते.

Terror Threat T20 World Cup : वेस्ट इंडिजमध्ये होणार्‍या टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत आक्रमणाची पाकिस्तानस्थित आतंकवादी संघटनेची धमकी

यावरून ‘पाकिस्तान आतंकवाद्यांचे आश्रयस्थान आहे’, हे अमेरिका आणि इतर पाश्‍चात्य देश यांनी आता तरी मान्य करून पाकला निधी देण्याचे थांबवावे !

जीवघेणा खेळ !

चुकीचे आदर्श अन् तीव्र द्वेषापोटी लोक एकमेकांचे आयुष्यही उद्ध्वस्त करण्यास पुढे-मागे पहात नाहीत. त्यामुळे जीवन सार्थकी लागण्यासाठी योग्य आदर्श ठेवणे अन् आचरण असणे किती आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !

संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलातील नवीन सिद्ध केलेला कृत्रिम धावमार्ग केवळ पाचच दिवसांत उखडला !

धावमार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होणे यात भ्रष्टाचार झाला नसेल कशावरून ? कोट्यवधी रुपये खर्चून सिद्ध केलेला धावमार्ग पाचच दिवसांत कसा उखडतो ? अशा प्रकारे पैशांची उधळपट्टी करणार्‍यांकडून पैसे वसूल करायला हवेत !

अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे कोल्हापूरच्या ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’चे चित्तथरारक सादरीकरण !

भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून अयोध्या येथे उत्तरप्रदेश सरकारच्या वतीने श्रीराम उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भारतातील सर्व राज्यांतील नामवंत प्रसिद्ध संस्कृतीचे लोककलेचे सादरीकरण करण्यात येत आहे.

७ कोटींहून अधिक जणांचा ‘ऑनलाईन’ रमी खेळात सहभाग !

कायदेशीर आधार घेऊन युवकांना जुगाराकडे ओढणार्‍या ऑनलाईन खेळांवर निर्बंध आणण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक !

SAFF U19 Women : भारत विजयी झाल्याने बांगलादेशी संघ आणि दर्शक यांच्याकडून गोंधळ अन् हिंसा !

भारताचा ‘मित्रदेश’ बांगलादेशातील जनता आणि खेळाडू यांची धर्मांध मानसिकता यातून दिसून येते. अशांना अद्दल घडवण्यासाठी भारत सरकारने पावले उचलावीत !