मैदानात नमाजपठण करणारा पाकिस्तानचा क्रिकेटपटू रिझवान याच्या विरोधात तक्रार

‘क्रिकेटचे मैदान खेळासाठी आहे, नमाजपठणासाठी नाही’, हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ सर्व खेळाडूंना का सांगत नाही ? आणि त्याविषयी शिक्षा का करत नाही ?

एशियाड क्रीडा स्पर्धांतील भारताचे उज्ज्वल यश !

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एशियाड क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय चमूने मिळवलेले यश अभूतपूर्व असेच म्हणावे लागेल ! याला कारण केंद्र सरकारने मागील काही वर्षांपूर्वीपासून  नियोजनबद्ध केलेले प्रयत्न आहेत !

मुझफ्फरपूर (बिहार) येथे भारत-पाक सामन्यात भारताचा विजय झाल्यावर फटाके फोडल्याने हिंसक विरोध !

ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्याच्या नावाखाली होणारा हिंसाचार योग्य नाही. हिंसाचार करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे !

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या अधिवेशनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन !

१४ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ‘जिओ वर्ल्ड सेंटर’मध्ये हे अधिवेशन होत आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने रशियाच्या ऑलिंपिक समितीची मान्यता केली रहित !

रशियाने आयओसीच्या नियमांचे उल्लंघन करत ‘डोनेट्स्क पीपल्स रिपब्लिक’, ‘खेरसॉन’, ‘लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक’ आणि ‘जापोरिजीया’ या क्षेत्रांना प्रांतीय ऑलिंपिक संघटनेची मान्यता दिली. हे आयओसीच्या नियमांच्या विरोधात आहे.

गोव्यात खासगी क्रीडा विद्यापिठाचे स्वागत करू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

काही संस्थांनी यात रस दाखवला आहे. जर एखाद्या खासगी संस्थेने ५० सहस्र चौ.मी. भूमी दाखवल्यास त्या संस्थेला विद्यापीठ चालू करता येईल. क्रीडा क्षेत्र हे भवितव्य घडवण्याचे एक साधन म्हणून अनेक जण त्याचा स्वीकार करणार आहेत.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांकडून भारताचा ‘शत्रू देश’ असा उल्लेख !

भारताने पाकच्या क्रिकेट संघाला देशात येण्याची अनुमती द्यायाला नको होती, हे यातून स्पष्ट होते ! खेळातही शत्रूत्व दाखवणार्‍या अशा देशावर भारताने बहिष्कार घातला पाहिजे ! जनतेने यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !

गोवा : ‘सनबर्न’ आणि ‘रायडर मॅनिया’ यांच्या आयोजकांना उच्च न्यायालयाचा दणका !

हणजूण कोमुनिदादचे प्रशासक आणि गोवा सरकार यांनी ‘सनबर्न’ अन् ‘रायडर मॅनिया’ यांच्या आयोजकांना हणजूण येथील कोमुनिदादच्या भूमीत महोत्सवाचे आयोजन करण्यासाठीचे शुल्क न्यून करण्याचा घेतलेला निर्णय गोवा खंडपिठाने रहित केला !

भारतीय खेळांना प्रोत्‍साहन आवश्‍यक !

भारताने यापुढे क्रिकेटसारख्‍या पाश्‍चात्त्य खेळांना महत्त्व न देता भारतीय खेळांवर लक्ष केंद्रित करायला हवे. त्‍यासाठी खेळाडूंना आवश्‍यक त्‍या सर्व सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍यास भारतही यापुढे प्रत्‍येक स्‍पर्धांमध्‍ये अधिक संख्‍येने पदांची लयलूट करतांना दिसेल, हे निश्‍चित !