SAFF U19 Women : भारत विजयी झाल्याने बांगलादेशी संघ आणि दर्शक यांच्याकडून गोंधळ अन् हिंसा !

  • १९ वर्षांखालील दक्षिण आशिया महिला फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना !

  • उभय देशांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले !

ढाका (बांगलादेश) – ‘दक्षिण आशिया फुटबॉल फेडरेशन’च्या १९ वर्षांखालील महिला फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद संयुक्तपणे भारत आणि बांगलादेश यांना देण्यात आले. दोन्ही संघांनी १-१ असे गोल केले होते. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्येही दोन्ही संघांची बरोबरीच राखली. शेवटी विजेता घोषित करण्यासाठी नाणेफेक करण्यात आले. हे भारताने जिंकल्याने भारताला विजेता घोषित करण्यात आले. यास बांगलादेशाच्या महिला खेळाडूंनी प्रचंड विरोध केला. तसेच ‘स्टेडियम’मधील दर्शकांनीही गोंधळ घालण्यास आरंभ केला. मोठा जमाव मैदानात बाटल्या फेकतांना दिसला, तर काहींनी दगडफेकही केली. सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे उभय देशांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.

ही स्पर्धा बांगलादेशात खेळली गेली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सामना अधिकार्‍यांना त्यांचा निर्णय पालटावा लागला. त्यांनी नाणेफेकीचा निर्णय रहित करून भारत आणि बांगलादेशला संयुक्त विजेते घोषित केले.

संपादकीय भूमिका

भारताचा ‘मित्रदेश’ बांगलादेशातील जनता आणि खेळाडू यांची धर्मांध मानसिकता यातून दिसून येते. अशांना अद्दल घडवण्यासाठी भारत सरकारने पावले उचलावीत !