पोलीसदलात ‘सीमा’ हव्यात !
बेपत्ता मुलांची समस्या ! केवळ पोलिसांवर दायित्व ढकलून चालणार नाही. त्यासाठी ‘गरिबी निर्मूलन करणे’, ‘मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे’, ‘मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्यांवर आळा घालणे’, यांसाठी शासन आणि समाजाकडूनही प्रयत्न व्हायला हवेत. सीमा ढाका यांच्या कामगिरीची नोंद घेतांना या सर्व सूत्रांचा सर्वांगाने अभ्यास होणे आवश्यक !