आतंकवाद्याची संमती !

वादळ आल्यावर शहामृगाने वाळूत तोंड लपवले; म्हणून संकट टळत नाही. अशीच काहीशी स्थिती भारतातील निधर्मीवाद्यांची झाली आहे; किंबहुना ‘ते वादळ नव्हेच, त्याला तसे संबोधणारेच कपटी आणि पूर्वग्रहदूषित’, अशी अज्ञानमूलक नि अहंगंडाने भारलेली भूमिका निधर्मीवाद्यांनी ‘जिहाद’च्या संदर्भात घेतलेली आहे. आज भारतासह संपूर्ण जग जिहादी आतंकवादामुळे अशांत आणि असुरक्षित आहे. ‘याचे मूळ मदरशांमधून देण्यात येणार्‍या कट्टर आणि धर्मांध विचारसरणीत आहे’, हे सत्य अनेकदा उघड होत असूनही निधर्मीवादी नेहमीच त्याला विरोध करतात. आता मात्र खुद्द एका जिहाद्यानेच याला पुष्टी दिलेली आहे. नुकतेच लंडन येथे एका २९ वर्षीय आतंकवाद्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत ‘माझ्या आईवडिलांनी मी ५ वर्षांचा असल्यापासून मला धर्मांधतेची शिकवण देण्यास प्रारंभ केला. इस्लामसाठी लढण्याचे, मुसलमानेतरांचा द्वेष करण्याचे, तसेच जिहादी सलाफी विचारसरणीच्या अंतर्गत ब्रिटनच्या विरोधात युद्ध करण्याचे शिक्षण दिले’, असे म्हटले आहे. जिहादी आतंकवादाविरुद्ध गेले अनेक दशके जगातील अनेक राष्ट्रे झुंज देत आहेत; मात्र ती संपूर्णत: यशस्वी का होत नाहीत ? याचे मूळ या आतंकवाद्याच्या तक्रारवजा वक्तव्यात आहे. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात एका मुसलमान तरुणाने ‘मदरशांमधून ‘गझवा-ए-हिंद’ची शिकवण दिली जाते. त्यात ‘हिंदूंना तलवारीने गळे चिरून ठार करा’, असे का शिकवले जाते ?’, असा उघड प्रश्न एका मौलवीला केला. यावर मौलवी निरुत्तर झाला होता. सध्या एकेक आतंकवाद्याला मारण्यासाठी प्रयत्न चालले आहेत; मात्र दुसरीकडे आतंकवाद्यांची निर्मिती बिनधोकपणे चालूच आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

निधर्मी, कथित भगव्या आतंकवादाची आरोळी ठोकणारे, भंपक मानवतावादाचा प्रसार करणारे आणि सत्तेपोटी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे एक प्रकारे या विचारसरणीला संरक्षण पुरवत आहेत. झाकीर नाईक, ओवैसी बंधू यांच्यासारखे धर्मांध तर उघडपणे बिनबोभाटपणे जिहादी विचारसरणीचा प्रसार करत आहेत आणि मोठ्या संख्येने त्याला अनुसरणारे निपजत आहेत. हिंदुद्वेषी धर्मांध आपल्या अवतीभोवती वावरत असून आपल्याच विरोधात कटकारस्थाने रचत आहेत. हे भयावह सत्य लक्षात घेऊन जिहादच्या विरोधात देश आणि जागतिक पातळीवर अधिक नेटाने संघटित कृती व्हायला हवी. पाकिस्तानसारखा देश उघडपणे आतंकवाद्यांना आश्रय देत असूनही जागतिक स्तरावर त्याची अपेक्षित कोंडी होत नाही. नुकतेच इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या धडक कारवाईने ‘आतंकवादाशी कसे लढायचे ?’, याचा पायंडा घालून दिला आहे. अन्य राष्ट्रांनीही तो अनुसरायला हवा. मनात आणले तर भारताला जिहादचे कंबरडे मोडणे अशक्य नाही. आवश्यकता आहे ती केवळ इच्छाशक्तीची ! जिहादचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समर्थन करणार्‍यांना या आतंकवाद्याने चांगलीच चपराक लगावली आहे. त्यामुळे या सर्वांनाच आता आडवे पाडून जिहाद्यांच्या विचारसरणीचा लक्ष्यभेद करायला हवा !