परभणी – जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरूड या वादग्रस्त अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी पदाचा पदभार असतांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून त्यांना वैयक्तिक मान्यता दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्षण उपसंचालकांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीअंती भुसारे आणि गरूड हे दोन्ही अधिकारी दोषी आढळल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले. वरील प्रकाराची तक्रार गंगाखेड येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव आणि महालिंग भिसे यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली होती.
संपादकीय भूमिका :निलंबित करणे, ६ मास चौकशी करून पुन्हा अशा अधिकार्यांचे स्थानांतर करणे, यांमुळे भ्रष्ट अधिकार्यांच्या मनोवृत्तीत कसा फरक पडणार ? अशांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करायला हवी. |