भारताने साहाय्य केले नसते, तर आणखी एक रक्तपात झाला असता ! – महिंदा अभयवर्धने

श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा अभयवर्धने यांनी मानले भारताचे आभार !

महिंदा अभयवर्धने

नवी देहली – भारताने श्रीलंकेला ज्या पद्धतीने साहाय्य केले, तसे साहाय्य इतर कोणत्याही देशाने केले नाही. आर्थिक संकटाच्या काळात भारताने आम्हाला वाचवले, अन्यथा आम्हा सर्वांना आणखी एका रक्तपाताला सामोरे जावे लागले असते, असे विधान श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी केले. श्रीलंका आर्थिक संकटात असतांना भारताने केलेल्या साहाय्यासाठी त्यांनी आभार मानले. गेल्या वर्षी श्रीलंकेला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. या वेळी भारताने आपुलकी दाखवत श्रीलंकेला वेगवेगळ्या माध्यमाद्वारे सुमारे ४ अब्ज डॉलर्सचे (सुमारे ३३ सहस्र कोटी ४६ रुपयांचे) साहाय्य केले होते.

महिंदा यापा अभयवर्धने यांनी श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले आणि अन्य अधिकारी यांच्या उपस्थितीत म्हटले की, येथे तुमचे (भारताचे) राजदूत आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत. आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांचा आदर करतो.