माहूरगड येथील दत्त जयंती यात्रा रहित

श्री दत्त संस्थान, माहूरगड यांच्या वतीने पारंपरिक दत्तजयंती सोहळा या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे रहित करण्यात आला आहे. यात्रेला येणार्‍या भाविकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून श्री दत्त संस्थानच्या विश्‍वस्तांनी हा निर्णय घेतला आहे.

धवडकी (सावंतवाडी) येथील श्री दत्तमंदिर

सावंतवाडी येथील कै. बाबी अंधारी यांच्या हस्ते १३ डिसेंबर १९४५ या दिवशी धवडकी येथे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गाच्या बाजूला औदुंबर वृक्षाखाली एका घुमटीत श्री दत्तगुरूंची मूर्ती स्थापन करण्यात आली.

तपोभूमी येथे श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने श्री दत्त भिक्षा-शिधा समर्पण विधी

श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ येथून श्री दत्तजयंती महोत्सवाचे Shree Datta Padmanabh Peeth या ‘फेसबूक पेज’वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भाविकांची याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दत्त हाच खरा मोक्षगुरु

श्रीपाद श्रीवल्लभ’ हा दत्ताचा पहिला अवतार आणि श्री नृसिंह सरस्वती’ हा दुसरा अवतार होय. तसेच माणिकप्रभु’ तिसरे आणि श्री स्वामी समर्थ महाराज’ हे चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत.  

पितृपक्षातील काळात श्रीदत्ताच्या विशिष्ट नामजपाचा साधकांवर पुष्कळ अधिक सकारात्मक परिणाम होणे

श्रीदत्ताचे नामजप ऐकल्याचा व्यक्तीवर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने घेण्यात आलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण देत आहोत.

मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान येथे दत्तजयंती उत्सव

तालुक्यातील मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान, नवनाथ उपासक, प.पू. श्री बाळकृष्ण महादेव घडशी महाराज यांच्या तपोभूमीत दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत प्रतिदिन ‘गुरुचरित्रा’चे पारायण होत आहे.