
कोची (केरळ) – केरळमध्ये दत्तजयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने हिंदी भाषेत प्रवचन आणि सामूहिक नामजप या ऑनलाईन उपक्रमांचे आयोजन केले. त्याला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद लाभला.

अ. दत्तजयंतीच्या निमित्ताने आयोजित प्रवचनात दत्तगुरूंची वैशिष्ट्ये, नामजपाचे महत्त्व, पितृदोषाची लक्षणे आदींविषयी माहिती सांगण्यात आली. त्याला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
आ. सामूहिक नामजपाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दत्तजयंतीच्या म्हणजेच २९ डिसेंबर या दिवशी श्री दत्तांच्या ऑनलाईन सामूहिक नामजपाचे आयोजन हिंदी आणि मल्याळम् भाषेत करण्यात आले. मल्याळम् भाषेतील कार्यक्रमाच्या प्रारंभी दत्तजयंतीचे आणि दत्ताच्या नामजपाचे महत्त्व यांविषयी कु. गायत्री यांनी उपस्थितांना सांगितले. तसेच हिंदी भाषिक कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमती नीता सुखठणकर यांनी प्रार्थना, तर सौ. अवनी लुकतुके यांनी भावार्चना घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मेघना सिजू यांनी केले.
वैशिष्ट्यपूर्ण
- सौ. दीपा नंदन आणि श्री. प्रकाश प्रभु यांनी सांगितले की, जप करतांना आज्ञाचक्राकडे आणि डोळ्याकडे त्यांना चांगली संवेदना जाणवली अन् भावजागृत झाला.
- सौ. मिनी राजेश सांगितले की, नामजप करण्याआधी घरातील काही अडचणींमुळे त्या तणावात होत्या; पण नामजप झाल्यानंतर त्यांचे मन, शरिर हलके होऊन आनंद मिळाला.
- एका जिज्ञासूंना ते दत्तगुरूंच्या चरणी बसून जप करत असल्याचे जाणवून मनाला खूप शांत आणि चांगले वाटले.
- सौ. स्मिता कैमल यांना जाणवले की, जपाच्या आधी जेव्हा प्रार्थना चालू झाली, त्या वेळी त्यांच्या बोटातून शरिरात शक्ती जात आहे.
- कु. स्मिता परूळकर यांनी सांगितले की, जपाच्या वेळी खूप शांत वाटले, तसेच त्या भगवान दत्तात्रेयांच्या चरणापाशी असल्यासारखे वाटले. स्वतःला खूप ताण जाणवत असल्यामुळे खूप भीती वाटत होती; पण ती थोडी न्यून झाली आणि शांती जाणवली.
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’