उत्तरप्रदेश आणि बिहार येथे ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आयोजित प्रबोधन मोहिमेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम

वाराणसी (उत्तरप्रदेश) –  हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ डिसेंबरच्या रात्री होणार्‍या अप्रिय आणि अनैतिक घटना थांबवण्यासाठी राबवण्यात आलेल्या प्रबोधन मोहिमेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेच्या अंतर्गत समितीच्या वतीने अधिवक्ता, उद्योगपती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले. उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांतील अनेक युवकांनी त्यांचे मित्र, नातेवाईक यांच्या ऑनलाईन बैठकांचे आयोजन केले. या समवेतच सामाजिक माध्यमांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून दत्तजयंतीनिमित्त प्रवचने अन् सामूहिक नामजप यांचे आयोजन

समाजाला धर्मशिक्षण मिळावे, यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने दत्तजयंतीनिमित्त १४ प्रवचने आणि ५ सामूहिक जप यांचे आयोेजन करण्यात आले. या दोन्ही उपक्रमांचा उत्तरप्रदेशमधील प्रयागराज, गाझीपूर, वाराणसी, कानपूर, अयोध्या आणि बिहारच्या पाटणा, वैशाली, समस्तीपूर, मुझफ्फरपूर येथील शेकडो जिज्ञासूंनी लाभ घेतला.

विशेष

  • नवीन वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेलाच साजरे करण्याची युवकांकडून प्रतिज्ञा !
  • हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित मोहिमेंतर्गत युवकांनी ‘आम्ही आजपासून आयुष्यभर चैत्र शुक्ल प्रतिपदेलाच नवीन वर्ष साजरे करणार’, अशी प्रतिज्ञा केली.