भयावर मात करून सध्याच्या भयावह संकटाला सामोरे जाणे ही आपल्या गुरुभक्तीची कसोटी ! – पू. प्रमोद केणे, दत्त संप्रदाय

पू. प्रमोद केणे

कळंबोली (पनवेल) – सध्याचा काळ हा अत्यंत कठीण, भयावह आणि कोरोनारूपी भस्मासुराने व्याप्त आहे. चहूबाजूला मृत्यूचे थैमान चालू आहे. संपूर्ण विश्‍व या महामारीमुळे त्रस्त आहे. तरीही भयभीत होऊ नका. धीर सोडू नका. ईश्‍वरावरील असीम निष्ठेची ही कसोटी आहे. यातून तावून सुलाखून आपल्याला बाहेर पडायचे आहे. काही बंधने स्वतःच स्वतःवर लादून घ्यावयाची आहेत. कोरोनासाठीच्या निर्बंधांचे पालन करायचे आहे. दिवसातून किमान दोन वेळा हळदीच्या पाण्याची वाफ घेण्यासह हळद आणि ओवायुक्त गरम पाण्याचे सेवन करणे आपल्यासाठी हितकारक ठरेल. भयावर मात करून संकटाला सामोरे जायचे आहे, ही आपल्या गुरुभक्तीची कसोटी आहे, असे मार्गदर्शन दत्त संप्रदायाचे पू. प्रमोद केणे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. उमेश किचंबरे यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.