रामनवमीनिमित्त श्री कछ गुर्जर क्षत्रिय समाज महिला मंडळ, धनबाद यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन
धनबाद – मर्यादापुरुषोत्तम श्रीराम यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपणही समर्पित भावाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी म्हणजेच रामराज्यासाठी प्रयत्न केले, तर प्रभु श्रीरामाची कृपा आपल्यावर होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर राज्य संघटक श्री. शंभू गवारे यांनी केले. रामनवमीनिमित्त श्री कछ गुर्जर क्षत्रिय समाज महिला मंडळ, धनबाद यांच्या वतीने एका ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्री. गवारे यांनी संबोधित केले.
या वेळी श्री. गवारे यांनी रामनवमी साजरी करण्यामागील शास्त्र, पूजा विधी, प्रभु श्रीराम यांच्या जीवनाशी संबंधित घटनांशी असलेला साधनेचा संबंध आणि त्याचे महत्त्व, मनुष्य जीवनाचा उद्देश, श्री कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त यांचा नामजप करण्याचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री कछ गुर्जर क्षत्रिय समाज महिला मंडळ, धनबादच्या प्रमुख शमिता परमार यांनी केले होते. या कार्यक्रमाला श्री कछ गुर्जर क्षत्रिय समाजाचे धनबाद येथील प्रमुख श्री. नरेश चावडा आणि माजी प्रमुख श्री. मनमोहन चावडा उपस्थित होते. समितीच्या पूजा चौहान यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
क्षणचित्र
कार्यक्रमानंतर अनेकांनी सांगितले की, तुम्ही आम्हाला सांगितलेली माहिती यापूर्वी आम्ही कधीच ऐकली नव्हती. यापुढेही आम्हाला अशा प्रकारचे मार्गदर्शन मिळाले, तर पुष्कळ आनंद होईल.