आयात रखडल्याने वाहन उद्योग अडचणीत येणार

कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला बसणार आहे. वाहन उद्योगासाठी लागणारे ३० ते ४० टक्के सुटे भाग चीनहून आयात होतात; मात्र चीनमध्ये उत्पादनावर मर्यादा आल्याने, तसेच आयात थांबल्याने वाहन उद्योगावर संकट निर्माण होणार आहे.

पाकिस्तानात ‘लॉकडाऊन’ करू शकत नाही ! – इम्रान खान

पाक कोरोनाशी लढण्यास कुठल्याही पातळीवर सक्षम नाही आणि हे पाकिस्तानी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. आतातरी पाकला आणि त्यांच्या जिहाद्यांना त्यांनी देशाची कोणती प्रगती केली, हे लक्षात आले असेल, अशीही अपेक्षा करता येणार नाही !

गुढीपाडव्याला ‘मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार’ हा संकल्प करा ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी दुसरीकडे रुग्णालयात भरती असलेले रुग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे.

जमावबंदीचा आदेश असतांनांही कल्याण येथे रस्त्यावर जमणार्‍या धर्मांधांवर गुन्हा नोंद

कायदा आणि पोलीस यांचा जराही धाक नसलेले धर्मांध नेहमीच समाजघातकी आणि देशविरोधी कृत्ये करतात !

कोरोनाच्या संकटाचा कुणीही संधी म्हणून उपयोग करू नका ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मी पोलिसांचे अभिनंदन करतो की, त्यांनी लाखो रुपयांचा ‘मास्क’चा साठा पकडला आहे. आपण थोडा समजूतदारपणा दाखवला पाहिजे. आपण जगणे थांबवलेले नाही, तर अधिक जगण्यासाठी जगण्याच्या शैलीत काही पालट केला आहे.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सार्वजनिक ठिकाणांची महापालिकेकडून निर्जंतुकीकरणासह अन्य उपाययोजना

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिकेकडून सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासह अन्य उपाययोजना करण्यात येत आहेत…

पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेलची विक्री बंद

संचारबंदी असतांनाही येथील पेट्रोल पंपांवर गर्दी होते. त्यामुळे २४ मार्चपासून पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेलची विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे……

भारताने कोरोना रोखण्यासाठी उचलेली कठोर पावले योग्यच ! – मायकल जे रेयान, संचालक, जागतिक आरोग्य संघटना

भारत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचलत असलेली पावले कठोर असली, तरीही ती योग्यच आहेत. या प्रकारची पावले उचलणे भारताने चालू ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक मायकल जे रेयान यांनी कौतुक म्हणून केले आहे……

कस्तुरबा रुग्णालयातील १२ संशयितांना कोरोनाची लागण नसल्याचे निष्पन्न

येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात कोरोनाबाधित म्हणून उपचार चालू असलेल्या रुग्णांच्या दुसर्‍यांदा घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये १२ जणांना कोरोनाची लागण नसल्याचे आढळून आले आहे.

कोरोनामुळे संपूर्ण जग भयावह मंदीच्या खाईत लोटले जाईल ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची चेतावणी

कोरोनामुळे संपूर्ण जगाला गंभीर आर्थिक हानीला सामोरे जावे लागत आहे. वर्ष २००८ मध्ये आलेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटानंतर वर्ष २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये ०.६ टक्के इतकी घसरण झाली होती;……….