कस्तुरबा रुग्णालयातील १२ संशयितांना कोरोनाची लागण नसल्याचे निष्पन्न

मुंबई – येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात कोरोनाबाधित म्हणून उपचार चालू असलेल्या रुग्णांच्या दुसर्‍यांदा घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये १२ जणांना कोरोनाची लागण नसल्याचे आढळून आले आहे. याविषयी आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शाह यांनी सांगितले की, कोरोनाची लागण नसल्याचे निष्पन्न झाले असले, तरी पुढील १४ दिवस या रुग्णांना अलगीकरणात कक्षात ठेवण्यात येणार आहे.