कोरोना आणि बहुराष्ट्रीय आस्थापनांची ‘नफेखोरी’ची वृत्ती
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर काही आस्थापनांनी आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; पण तोपर्यंत ही आस्थापने चालूच ठेवण्यात आली होती.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर काही आस्थापनांनी आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; पण तोपर्यंत ही आस्थापने चालूच ठेवण्यात आली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील बेघर आणि भिक्षेकरी यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाजी-पोळीचे पाकीट अन् पाणी यांचे वाटप केले.
जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल ‘होम क्वारंटाईन’ (विलगीकरण) झाल्या आहेत. नुकतीच एका डॉक्टरांनी अँजेला मर्केल यांची भेट घेतली होती. ते भेट घेतलेले डॉक्टर कोरोनाच्या वैद्यकीय चाचणीमध्ये ‘पॉझिटिव्ह’ आढळले.
भारतीय उद्योग श्रेत्रातील मोठी आस्थापने आणि व्यक्ती यांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्यास प्रारंभ केले आहे.
राजवाड्यातील एका कर्मचार्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ब्रिटीश साम्राज्याच्या द्वितीय राणी ऍलिझाबेथ यांनी त्यांच्या प्रशस्त राजवाड्यातून अन्य ठिकाणी अनिश्चित काळासाठी स्थलांतर केले आहे.
चलनी नोटा हाताळल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत, तसेच नोटा किंवा नाणी हाताळून संसर्गाला आमंत्रण देण्यापेक्षा लोकांनी डिजिटल बँकिंगचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन इंडियन बँक्स असोसिएशनने नागरिकांना केले आहे.
येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर मशिदीतून घरीच नमाजपठण करण्याचे आवाहन केले गेले.
कोरोनाबाधित असा अपप्रचार करून परदेशातून आलेल्या कोल्हापुरातील काही व्यक्तींची सूची सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे पुढे पाठवल्यास गुन्हा नोंद केला जाईल, अशी चेतावणी डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही.
‘होम क्वारंटाईन’ असलेल्या व्यक्ती दायित्वशून्यपणे घराबाहेर पडत असल्याच्या घटना घडल्यानंतर महापालिकेने पुढचे पाऊल म्हणून ‘होम क्वारंटाईन’ व्यक्तींच्या घराच्या दारावर पत्रक लावण्याचा निर्णय घेतला आहे.
येथील कारागृहामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या अफवेनंतर २१ मार्च या दिवशी कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न करतांना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये २३ जणांचा मृत्यू झाला, तर ८३ जण घायाळ झाले.