जमावबंदीचा आदेश असतांनांही कल्याण येथे रस्त्यावर जमणार्‍या धर्मांधांवर गुन्हा नोंद

  • कायदा आणि पोलीस यांचा जराही धाक नसलेले धर्मांध नेहमीच समाजघातकी आणि देशविरोधी कृत्ये करतात !
  • जमावबंदी आदेश लागू असल्याने एकत्र येणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्यासाठी कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. पराग तेली यांनी पोलिसांकडे पाठपुरावा केला, तसेच भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष श्री. उपेंद्र डहाके यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. नंतर ही कारवाई करण्यात आली.

 

ठाणे, २४ मार्च (वार्ता.) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ‘जनता कर्फ्यू’ पुकारला असतांना आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असतांनाही २२ मार्चला कल्याण (पश्‍चिम) येथील वल्लीपीर रस्ता भागातील चौकात १० ते १५ धर्मांध एकत्र जमले. या धर्मांधांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि मानवी जीवनास कोरोना विषाणूचा संसर्ग होईल, अशी घातकी कृती केल्याप्रकरणी पोलिसांनी १० धर्मांधांवर गुन्हे नोंद केले आहेत. ही घटना घडली, त्या स्थळापासून हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे, तसेच पोलिसांची गस्त चालू होती. या घटनेचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. यानंतर या घटनेचा गुन्हा येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला. त्यामुळे ‘अशा घटनांवर तात्काळ कारवाई झाल्यास पुढे असे धाडस करण्यास कोणी धजावणार नाही’, अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत होती.