बांगलादेशच्या दौर्‍यावर असणारा पाकिस्तानी क्रिकेट संघ सरावाच्या वेळी पाकचा झेंडा लावत असल्याने होत आहे विरोध !

बांगलादेशमध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघ ३ ‘ टी-२०’ क्रिकेट सामने खेळणार आहे. यासाठी पाकचा संघ बांगलादेशात पोचला आहे. तेथे  सरावाच्या वेळी संघाने पाकचा झेंडा लावल्याने वाद निर्माण झाला आहे.

चीन बांगलादेशला भंगारातील शस्त्रे विकत आहे ! – तस्लिमा नसरीन यांचा दावा

चीनने आतापर्यंत ज्या देशांना शस्त्रे, कोरोनाविषयी उपकरणे आदी विकले ते निकृष्ट दर्जाचेच निघाल्याचे उघड झाले आहे. चीन विश्‍वासघातकी आहे, हे आता जगाला  कळू लागले आहे !

बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !

बांगलादेशात शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि ‘इस्कॉन’ मंदिरांवर आक्रमणे करणार्‍या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांड घडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले

बांगलादेशातील हिंदूंवरील मुसलमानांच्या आक्रमणांच्या विरोधात लिखाण केल्याने फेसबूककडून माझे खाते ७ दिवसांसाठी बंद ! – लेखिका तस्लिमा नसरीन

हिंदूंनी फेसबूकचा निषेध करून तस्लिमा नसरीन यांचे खात पुन्हा चालू करण्यासाठी त्याच्यावर दबाव निर्माण केला पाहिजे !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या निषेधासाठी दिवाळीत भारतातील हिंदू काही वेळ दिवे बंद करतील, अशी आशा ! – तस्लिमा नसरीन

हिंदूंना साहाय्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार्‍या तस्लिमा नसरीन यांचा हा विचार चांगला असला, तरी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणासाठी हिंदूंनी दिवाळीत दिवे बंद करण्यापेक्षा सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !

बांगलादेशमध्ये हिंदूंवरील आक्रमणांच्या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह ६८३ जणांना अटक !

अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी भारताने बांगलादेश सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !

भारत आणि बांगलादेश येथे चाललेल्या हिंदूंच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ भाजपचा ठाणे येथे मूक मोर्चा !

भारत आणि बांगलादेश येथे होणार्‍या हिंदूंच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ भाजपच्या कामगार आघाडीच्या वतीने ठाणे येथे मूक मोर्चा काढण्यात आला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचून निषेध व्यक्त व्हावा, या उद्देशाने २३ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३.३० वाजता या मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

बांगलादेशातील हिंदुविरोधी हिंसाचाराच्या प्रकरणी आणखी एका सूत्रधाराला अटक

रंगपूरच्या पीरगंज उपजिल्ह्यात १७ ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचाराचा सूत्रधार असलेला शैकत मंडल आणि त्याचा साथीदार या दोघांना ढाक्याच्या सीमेवरील गाझीपूर येथून अटक करण्यात आली.

बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात पणजी येथे इस्कॉनच्या वतीने निषेध मोर्चा

गोमंतकीय हिंदूंनो, हिंदूंवरील आक्रमणाविषयी लोकप्रतिनिधी गप्प आहेत. निवडणुकीसाठी ते मत मागायला येतील, तेव्हा ‘त्यांनी या प्रकरणी मौन का पत्करले ?’ ते विचारा !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या निषेधार्थ ‘इस्कॉन’कडून १५० देशांतील ७०० मंदिरांजवळ आंदोलने !

ट्विटरवरील #SaveBangladeshiHindus हा हॅशटॅग ट्रेंड जागतिक स्तरावर ५ व्या क्रमांकावर !