बांगलादेशातील हिंदूंवरील मुसलमानांच्या आक्रमणांच्या विरोधात लिखाण केल्याने फेसबूककडून माझे खाते ७ दिवसांसाठी बंद ! – लेखिका तस्लिमा नसरीन

  • फेसबूकचा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम जाणा ! धर्मांधांकडून हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना कुणी वाचा फोडत असेल किंवा त्यास विरोध करत असेल, तर फेसबूकला त्याचा त्रास का होतो ? ‘फेसबूकही धर्मांधांचा समर्थक आहे आणि हिंदूंवर होणारी आक्रमणे त्याला योग्य वाटतात’, असे हिंदूंनी समजायचे का ? – संपादक
  • हिंदूंनी फेसबूकचा निषेध करून तस्लिमा नसरीन यांचे खात पुन्हा चालू करण्यासाठी त्याच्यावर दबाव निर्माण केला पाहिजे ! – संपादक
बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – बांगलादेशातील विस्थापित लेखिका तस्लिमा नसरीन यांचे फेसबूक खाते ७ दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. स्वतः तस्लिमा यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली. ‘बांगलादेशमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या विरोधात मी लिखाण करून सत्य सांगितल्यामुळे माझे फेसबूक खाते ७ दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे’, असे तस्लिमा यांनी सांगितले. (एरव्ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची ओरड करणारे आता कुठल्या बिळात जाऊन लपले आहेत ? – संपादक)