बांगलादेशातील हिंदुविरोधी हिंसाचाराच्या प्रकरणी आणखी एका सूत्रधाराला अटक

  • आतापर्यंत अनुमाने ६०० जणांना अटक
  • अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी भारत सरकारने बांगलादेशवर दबाव आणला  पाहिजे !

ढाका (बांगलादेश) – बागंलादेशात हिंदूंवरील आक्रमणाच्या षड्यंत्रातील आणखी एका सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. रंगपूरच्या पीरगंज उपजिल्ह्यात १७ ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचाराचा सूत्रधार असलेला शैकत मंडल आणि त्याचा साथीदार या दोघांना ढाक्याच्या सीमेवरील गाझीपूर येथून अटक करण्यात आली. ‘मंडल याने ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे हिंदूविरोधी मजकूर प्रसारित करून धर्मांधांना चिथवले. यानंतर भडकलेल्या धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला’, असे अन्वेषण अधिकार्‍यांनी सांगितले. या हिंसाचारामध्ये हिंदूंची किमाने ७० घरे आणि दुकाने पेटवून देण्यात आली.

यापूर्वी कोमिल्ला येथे श्री दुर्गापूजा मंडपात कुराणाची प्रत ठेवणारा प्रमुख संशयित इक्बाल हुसेन याला पोलिसांनी अटक केली होती. हुसेन याला सध्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत बांगलादेशात अनुमाने ६०० लोकांना अटक करण्यात आली आहे.