बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या निषेधार्थ ‘इस्कॉन’कडून १५० देशांतील ७०० मंदिरांजवळ आंदोलने !

ट्विटरवरील #SaveBangladeshiHindus हा हॅशटॅग ट्रेंड जागतिक स्तरावर ५ व्या क्रमांकावर !

इस्कॉनकडून केला जाणारा निषेध अभिनंदनीय असला, तरी धर्मांधांवर वचक बसवण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. भारताने यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक

नवी देहली – बांगलादेशात धर्मांधांकडून हिंदूंवर केलेल्या आक्रमणांच्या विरोधात २३ ऑक्टोबर या दिवशी ‘इस्कॉन’ (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस) या संस्थेने १५० देशांतील त्यांच्या ७०० मंदिरांजवळ निषेध आंदोलने केली. या वेळी धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

यासंदर्भात इस्कॉनचे प्रवक्ते आणि उपाध्यक्ष श्री. राधा रमणदास यांनी हिंदूंना आवाहन करतांना म्हटले, ‘‘जागतिक समुदायाने बांगलादेशातील हिंदु बांधवांच्या अत्याचारांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. हिंदूंवर झालेल्या आक्रमणांविषयी जागतिक स्तरावर जागृती करण्यासाठी जपानची राजधानी टोकियोपासून कॅनडाची राजधानी टोरंटोपर्यंत ७०० ठिकाणी आम्ही ‘जागतिक कीर्तन आंदोलन’ करणार आहोत. हिंदूंनी आपल्या जवळच्या आंदोलनस्थळी जाऊन हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात निषेध नोंदवावा.’’

१. या आंदोलनाला ट्विटरवरून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. #SaveBangladeshiHindus या ‘हॅशटॅग’ने (एकाच विषयावर घडवून आणलेल्या चर्चेने) जागतिक स्तरावरील हिंदुत्वनिष्ठांनी या विषयावर ‘ट्रेंड’ (चर्चेत असलेला विषय) करत जागृती केली. हा हॅशटॅग जागतिक ‘ट्रेंड्स’मध्ये पाचव्या क्रमांकापर्यंत पोचला, तर राष्ट्रीय स्तरावर अनेक घंटे अग्रस्थानी होता. या हॅशटॅगचा वापर करून ४ लाख ७० सहस्रांहून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी ट्वीट्स केल्या.

२. अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रवक्ते, कार्यकर्ते, तसेच अधिवक्त्यांच्या समवेत विविध प्रथितयश हिंदु धर्मप्रेमींनी या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला. सहस्रावधी हिंदूंनी त्यांच्या हातात बांगलादेशी हिंदूंचे रक्षण करण्याचा आशय असणारे ‘प्लाकार्ड’ (हस्तफलक) धरल्याची छायाचित्रे ट्विटरद्वारे प्रसारित केली.

इस्कॉनच्या ‘जागतिक कीर्तन आंदोलना’ला आमचे समर्थन ! – सनातन संस्था

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी या विषयावर त्यांचा व्हिडिओ ट्वीट करत म्हटले, ‘बांगलादेशातील मंदिरे, तसेच हिंदू, विशेषकरून इस्कॉनच्या साधूंवरील आक्रमणे घृणास्पद असून त्यांचा धिक्कार व्हायला हवा. इस्कॉनच्या ‘जागतिक कीर्तन आंदोलना’ला सनातन संस्थेचे समर्थन असून मी जागतिक समुदायाचे आवाहन करतो की, त्यांनीही बांगलादेशी हिंदूंच्या व्यथेविषयी जागृती करण्याच्या कार्यात आपले योगदान द्यावे.’’

‘सनातन प्रभात’च्या SanatanPrabhat.org या संकेतस्थळावरून ठळक प्रसिद्धी !

गेल्या १५ दिवसांत बांगलादेशात घडलेल्या हिंदूंवरील आक्रमणांच्या सर्व घटनांना दैनिक ‘सनातन प्रभात’ने, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या संकेतस्थळाने ठळक प्रसिद्धी दिली. संकेतस्थळावरील पुढील मार्गिकांवर आपण ही सर्व वृत्ते वाचू शकता :

मराठी : https://sanatanprabhat.org/marathi/tag/attacks-on-hindus-in-bangladesh-in-october-2021

हिंदी : https://sanatanprabhat.org/hindi/tag/attacks-on-hindus-in-bangladesh-in-october-2021

कन्नड : https://sanatanprabhat.org/kannada/tag/attacks-on-hindus-in-bangladesh-in-october-2021

इंग्रजी : https://sanatanprabhat.org/english/tag/attacks-on-hindus-in-bangladesh-in-october-2021