Ayodhya Ram Mandir : श्री रामललाच्या दर्शनसाठी अयोध्याच्या प्रवेशद्वारावर लाखो भाविक प्रतीक्षेत !

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन

अयोध्याच्या प्रवेशद्वारावर प्रतीक्षेत भाविक

अयोध्या, २२ जानेवारी (वार्ता.) – २२ जानेवारी या दिवशी सुरक्षिततेच्या कारणास्तव श्रीरामजन्मभूमीवरील नूतन मंदिराच्या ठिकाणी केवळ निमंत्रितांना प्रवेश होता; मात्र असे असूनही प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळी अयोध्यानगरीच्या प्रवेशद्वारावर सहस्रावधी भाविक उपस्थित होते.

यासह अयोध्यानगरीतही श्री रामललाच्या दर्शनासाठी लाखो भाविक आले आहेत. २३ जानेवारीपासून सर्वसामान्यांना श्री रामललांचे दर्शन घेता येणार आहे. हे सर्व भाविक श्रीरामललांच्या दर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.