दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘श्री रामलला विशेषांका’स उत्स्फूर्त प्रतिसाद !

सांगली – दैनिक ‘सनातन प्रभात’ने २१ जानेवारीला श्रीरामाविषयी माहिती देणारा रंगीत ‘श्री रामलला विशेषांक’ प्रकाशित केला होता. याला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी नागरिक, मंडळे यांनी स्वयंस्फूर्तीने दैनिकाचे प्रकाशन, वितरण केले.

१. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत पुण्यभूमी मूळ स्थान असलेल्या बत्तीसशिराळा येथील श्री क्षेत्र जोतिर्लिंग देवस्थान येथे या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी माजी सरपंच आनंदराव शेळके, पोलीस पाटील श्री. युवराज पाटील, श्री. सचिन दरगडे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य श्री. दत्तात्रय पाटील (संपादक – ज्ञानदर्शन वार्ता) उपस्थित होते.

बत्तीसशिराळा येथील श्री क्षेत्र जोतिर्लिंग देवस्थान येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘श्री रामलला विशेषांका’चे प्रकाशन करतांना श्री. दत्तात्रय पाटील (केशरी सदरा घातलेले), तसेच मान्यवर

२. शिरसी येथे विधान परिषदेचे दिवंगत सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी मान्यवरांना हा विशेषांक नागरिकांना दाखवला. या प्रसंगी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख श्री. सत्यजित देशमुख, शिरसी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. स्मिता भोसले, युवानेते श्री. विजय झिमुर, हणमंतराव पाटील उपस्थित होते.

आरोग्य शिबिरात नागरिकांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘श्री रामलला विशेषांक’ दाखवतांना श्री. सत्यजित देशमुख (डावीकडून चौथे), तसेच मान्यवर

३. वाटेगाव येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या शाखेच्या वतीने बस्थानक येथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी श्रीरामाची आरती करण्यात आली. या वेळी वाटेगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. नंदाताई किर्तीकुमार चौगुले यांच्या हस्ते अनेक भाविकांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक देण्यात आला. या प्रसंगी श्री. काकासाहेब लोहार यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

वाटेगाव येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बसस्थानकावर आयोजित कार्यक्रमात

कोल्हापूर – येथे २१ जानेवारीला सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘श्री रामलला विशेषांक’ वितरित करण्यात आला. या प्रसंगी भाजप खासदार श्री. धनंजय महाडिक, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.