ठाणे येथील मनसेचे पदाधिकारी जमील शेख हत्याकांड प्रकरणी एक संशयित कह्यात

मनसेचे जमील शेख यांच्या हत्येच्या प्रकरणात शाहीद शेख (वय ३५ वर्षे) या संशयिताला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कह्यात घेतले आहे.

श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ सैनिक हुतात्मा

जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असलेल्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही !

बंगालमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक

तृणमूल काँग्रेसने भाजपचा दगडफेकीचा आरोप फेटाळला !

मुंबईवरील आक्रमणात मृत झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये स्मारक उभारण्यात येणार !

स्मारक उभारणे हे योग्य असले, तरी ज्यांनी हे आक्रमण केले, त्यांची कबर खोदण्याची अधिक आवश्यकता आहे, त्यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ?

धाडस असेल, तर भाजप सरकारने चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवावे ! – असदुद्दीन ओवैसी यांचे आव्हान

ओवैसी म्हणाले, नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राइक करा. चीनवर तुम्ही गप्प का बसला आहात ? तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात आणि चीनचे नाव घेण्यासही घाबरत आहात. तुम्ही सर्जिकल स्ट्राइक करा, आम्ही तुमची प्रशंसा करू !

म्हैसुरू (कर्नाटक) येथे दलिताचे केस कापणार्‍या केशकर्तनालयाच्या मालकाला ५० सहस्र रुपयांचा दंड आणि सामाजिक बहिष्कार

हिंदु धर्मात ईश्‍वरनिर्मित वर्णाश्रमव्यवस्था आहे आणि त्यात जाती नाहीत. जाती या मनुष्याने निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे ईश्‍वरी राज्यात म्हणजेच हिंदु राष्ट्रात अशा प्रकारचा जातीभेद नसल्याने कुणावरही अन्याय होणार नाही !

हिंदुद्वेष्ट्या लेखिका अरूंधती रॉय यांनी जर्मन वृत्तवाहिनीवरून भारत शासनावर केलेल्या टिकेचे हिंदुत्वनिष्ठ मारिया वर्थ यांनी केलेले खंडण

‘भारतात इस्लामद्वेषाची परिसीमा’ या कार्यक्रमात अरूंधती रॉय यांनी केलेल्या भारतविरोधी टीकेचे हिंदुत्वनिष्ठ मारिया वर्थ यांनी केलेले खंडण प्रसिद्ध करत आहोत.

पाकिस्तानच्या विरोधातील संतप्त निदर्शनात पाकच्या ध्वजाची होळी

करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने हुतात्मा सैनिक संग्राम पाटील आणि ऋषिकेश जोंधळे यांना श्रद्धांजली

तमिळनाडूमध्ये हिंदु महासभेच्या नेत्याची अज्ञातांकडून घराबाहेर हत्या

काही मासांपूर्वी पोलिसांनी सुरक्षेची मागणी फेटाळली होती ! देशात हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्‍या हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

देहलीमध्ये बुरखाधारी महिलेकडून दुकानदाराशी झालेल्या वादातून गोळीबार !

एका बुरखाधारी धर्मांध महिलेकडेही आता पिस्तुले असतात आणि ती गोळीबार करते !