देहलीतील इस्रायलच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट : ४ – ५ गाड्यांची हानी

राजधानी देहलीत अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होणे अपेक्षित नाही !

इस्रायलच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट

नवी देहली – येथील एपीजे अब्दुल कलाम मार्गावर असलेल्या इस्रायलच्या दूतावासाबाहेर अल्प क्षमतेचा बॉम्बस्फोट झाला असून यात ४ – ५ वाहनांची हानी झाली आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पोलीस याची चौकशी करत आहेत. वर्ष २०१२ मध्येही येथे अशाच प्रकारचा बॉम्बस्फोट झाला होता. त्यात एक जण घायाळ झाला होता.