(म्हणे) अल्लाच्या कृपेने आणि साहाय्यामुळे स्फोट घडवणे शक्य झाले !

देहलीतील स्फोटाचे दायित्व जैश-उल्-हिंदने स्वीकारले !

नवी देहली – राजधानीत इस्रायलच्या दूतावासासमोर झालेल्या स्फोटाचे दायित्व जैश-उल्-हिंद या आतंकवादी संघटनेने स्वीकारले असून सामाजिक माध्यमात त्याविषयी दावा केला आहे. यानंतर सुरक्षायंत्रणांनी या दाव्यामागील सत्यता पडताळण्यास आरंभ केला आहे. ‘टेलीग्राम’वर २ व्यक्तींनी केलेला संवाद सुरक्षायंत्रणांच्या हाती लागला आहे. त्यामध्ये ‘सर्वशक्तिमान अल्लाच्या कृपेने आणि साहाय्यामुळे जैश उल हिंदचे सैनिक चोख बंदोबस्त असलेल्या देहलीतील परिसरात शिरले. त्यांनी आय.ई.डी. स्फोट घडवला.

सौजन्य आज तक

भारतातील प्रमुख शहरांवर आक्रमण करण्याचा हा प्रारंभ आहे. भारत सरकारकडून करण्यात येणार्‍या अत्याचारांचा हा सूड आहे,’ असे म्हटले गेले आहे. या स्फोटामध्ये कोणत्या प्रकारचे साहित्य वापरले होते, याची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा गार्डला पाचारण करण्यात आले आहे.