त्राल सेक्टरमध्ये ३ आतंकवादी ठार

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही !

त्राल (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादल आणि हिजबुल मुजाहिदीनचे आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार झाले.

(सौजन्य : IndiaTv )

येथे हे आतंकवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षादलांनी शोध मोहीम चालू केल्यावर ही चकमक उडाली. या आतंकवाद्यांकडे एके-४७, पिस्तुल आणि ४ ग्रेनेड असा साठा सापडला.