‘हा तर केवळ ट्रेलर आहे’, अशी धमकी देणारी चिठ्ठी सापडली !

  • देहलीतील बॉम्बस्फोटाचे प्रकरण

  • कासीम सुलेमानी आणि मोहसीन फखरीजादेह यांच्या हत्येचा सूड घेण्याचा प्रयत्न

इराणी सैन्याच्या प्रमुखाला आणि तेथील शास्त्रज्ञाला ठार मारल्याचा सूड आतंकवादी भारतात बॉम्बस्फोट घडवून करत असतील, तर ते संतापजनक आहे ! पूर्वी भारताला पाकपुरस्कृत आतंकवाद, बांगलादेशी घुसखोर यांच्याशी लढावे लागत होते. आता त्यात इराणमधील आतंकवादी संघटनांशीही लढावे लागणार, हे निश्‍चित !

नवी देहली – देहलीतील इस्रायलच्या दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यात इराणच्या ‘रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’चे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी आणि शास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांना ‘हुतात्मा’ म्हटल्याचे आणि हा केवळ ट्रेलर असल्याचे म्हटले आहे. सुलेमानी यांना अमेरिकेने आणि मोहसीन यांना इस्रायलने ठार केले आहे. यामुळे हे आतंकवादी आक्रमण या हत्यांचा सूड घेण्यासाठी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेच अन्वेषण करतांना परिसरातील ३ सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केल्यावर एक ‘कॅब’ (टॅक्सी) दिसून आली आहे. या कॅबने २ लोकांना घटनास्थळी सोडले होते. त्यानंतर कॅब निघून गेल्याचे दिसत आहे. कॅबमधून उतरल्यानंतर दोन्ही व्यक्ती ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, तेथे पायी जात आहेत, असे दिसून आले. पोलिसांनी या कॅबच्या चालकाशी संपर्क केला असून त्यांच्या माहितीच्या आधारे दोन्ही व्यक्तींची रेखाचित्रे बनवली जात आहेत.