उपचाराच्या वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यासाठी डॉक्टरांना दोषी ठरवता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

उपचाराच्या वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यासाठी डॉक्टरांना दोषी ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. ‘रुग्णांवर उपचार करतांना त्यांच्या आयुष्याची निश्‍चिती कुठलाच डॉक्टर देऊ शकत नाही.

२६/११ चे मुंबईवरील आक्रमण हे आतंकवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारे होते ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘पोलीस आणि एनएसजी कमांडो यांनी गोळ्या झेलून अनेक आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. शौर्य, धैर्य आणि समर्पण यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा अन् कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

परमबीर सिंह यांनी आतंकवादी कसाब याचा दूरभाष लपवला !

निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त समशेर खान पठाण यांचा खळबळजनक आरोप : पठाण यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसह त्यांनी हा गंभीर प्रकार आतापर्यंत का उघड केला नाही ? याचीही चौकशी झाली पाहिजे !

पाकमध्ये मंदिर तोडणार्‍यांपैकी ११ मौलवींना न्यायालयाने ठोठावलेला दंड हिंदु कौन्सिलने भरला !

पाकिस्तानमधील हिंदूंच्या या दैन्यावस्थेवर भारत सरकार काहीच भूमिका घेत नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. आता भारतातील हिंदूंनीच संघटित होऊन  पाकिस्तानला यासंदर्भात जाब विचारण्यासाठी भारत सरकारला बाध्य केले पाहिजे !

पंजाबमध्ये रा.स्व. संघाच्या शाखा आणि हिंदु नेते यांच्यावर आतंकवादी आक्रमणांची शक्यता ! – गुप्तचर विभागाची माहिती

जिहादी आतंकवादी हिंदु संघटना आणि त्यांचे नेते यांनाच लक्ष्य करतात, तरीही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ असे म्हणतात !

काँग्रेसला घरचा अहेर !

विश्वगुरु आणि महासत्ता बनण्याची क्षमता असणार्‍या भारताची काँग्रेसने जी दुरवस्था केली, त्यात पालट होण्याचा आरंभ चालू झाला आहे. काँग्रेसने केलेल्या अशाच शेकडो महाचुकांचे प्रायश्चित्त म्हणून आता उरल्यासुरल्या काँग्रेसलाही राजकारणातून विश्राम घेण्यास जनतेने भाग पाडले पाहिजे !

इस्लामिक स्टेटकडून तरुणांना आत्मघाती आतंकवादी बनवण्यासाठी ‘टिक टॉक’चा वापर

‘टिक टॉक’ हे चीनचे ‘अ‍ॅप’ असल्याने चीन यावर बंदी घालणार नाही; कारण इस्लामिक स्टेटचा प्रभाव चीनमध्ये नाही, तर चीनच्या शत्रू देशांमध्ये आहे, हे लक्षात घ्या !

नेदरलँडमध्ये कोरोनाविषयीच्या निर्बंधांच्या विरोधात नागरिकांचे हिंसक आंदोलन

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर नेदरलँडमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनाच्या वेळी हिंसाचार झाल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला.

काश्मीरमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

अशांना आता आयुष्यभर पोसण्याऐवजी त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

न्यायाधिशांना मारहाण करणारे पोलीस जनतेशी कसे वागत असतील, हे लक्षात येते !

अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्यावर आक्रमण केल्याच्या आणि त्यांना अश्‍लील शब्दांत शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी दोघा पोलिसांना अटक करण्यात आली. या पोलिसांनी न्यायाधीशांना मारहाण करत त्यांच्यावर पिस्तुल रोखले !