पाकमध्ये मंदिर तोडणार्‍यांपैकी ११ मौलवींना न्यायालयाने ठोठावलेला दंड हिंदु कौन्सिलने भरला !

  • मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात अडचणी आणत असल्याने भरला दंड !

  • ता अन्य १२३ धर्मांध आरोपींचीही त्यांचा दंड भरण्याची मागणी

  • पाकमधील हिंदूंवर होणारा हा अन्याय कोण दूर करणार ? – संपादक
  • पाकिस्तानमधील हिंदूंच्या या दैन्यावस्थेवर भारत सरकार काहीच भूमिका घेत नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. आता भारतातील हिंदूंनीच संघटित होऊन  पाकिस्तानला यासंदर्भात जाब विचारण्यासाठी भारत सरकारला बाध्य केले पाहिजे ! – संपादक

करक (पाकिस्तान) – येथे डिसेंबर २०२० मध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या मंदिरावर आक्रमण करून त्याची तोडफोड केली होती. नंतर न्यायालयाने हे आक्रमण करणार्‍यांपैकी ११ मौलवींना (इस्लामच्या धार्मिक नेत्यांना) दंड ठोठावला होता.

मौलवींनी आणलेल्या दबावानंतर हा दंड येथील हिंदु कौन्सिललाच भरावा लागला, असे वृत्त समोर आले आहे. यामुळे या प्रकरणातील अन्य १२३ आरोपींनीही त्यांना करण्यात आलेला दंडही हिंदु कौन्सिलनेच भरावा, अशी मागणी केली आहे; मात्र कौन्सिलने यास नकार दिला आहे. हिंदु कौन्सिलने प्रत्येक मौलवीवरील २ लाख ६८ सहस्र रुपयांचा दंड भरला आहे.

पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींकडून ३ कोटी ३० लाख रुपये वसूल करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर यांतील १० मौलवी या मंदिराचे पुनर्निमाण करण्यास विरोध करू लागले होते. स्थानिक प्रशासनही हिंदूंना साहाय्य करत नव्हते. त्यामुळेच हिंदु कौन्सिलने त्यांचा दंड भरला.