पंजाबमध्ये रा.स्व. संघाच्या शाखा आणि हिंदु नेते यांच्यावर आतंकवादी आक्रमणांची शक्यता ! – गुप्तचर विभागाची माहिती

जिहादी आतंकवादी हिंदु संघटना आणि त्यांचे नेते यांनाच लक्ष्य करतात, तरीही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ असे म्हणतात ! – संपादक 

जालंधर (पंजाब) – पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. ही पंजाबमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा आणि हिंदु नेते यांच्यावर जिहादी आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचत आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाने पंजाब सरकारला दिली. यानंतर राज्यात सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी सर्व पोलीस अधिकार्‍यांना गस्त वाढवण्याचा आदेश दिला आहे. जवळपास एक तृतीयांश अधिकार्‍यांना रात्रीच्या वेळी गस्त घालण्याचा आदेश दिला आहे.
२१ नोव्हेंबरच्या रात्री राज्यातील पठाणकोट येथील सैन्यतळाच्या प्रवेशद्वाराजवळ आतंकवाद्यांनी ग्रेनेड फेकून आक्रमण केले होते. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. राज्याच्या पाकलगतच्या सीमेवरून १५ ऑगस्टपासून आतापर्यंत २५ हून अधिक ड्रोन घुसले होते. त्याद्वारे शस्त्रे, हेरॉईन आणि ‘टिफिन बाँब’ पाठवले गेले. आतापर्यंत ११ ‘टिफिन बाँब’ जप्त करण्यात आले आहेत.