इस्लामिक स्टेटकडून तरुणांना आत्मघाती आतंकवादी बनवण्यासाठी ‘टिक टॉक’चा वापर

‘टिक टॉक’ हे चीनचे ‘अ‍ॅप’ असल्याने चीन यावर बंदी घालणार नाही; कारण इस्लामिक स्टेटचा प्रभाव चीनमध्ये नाही, तर चीनच्या शत्रू देशांमध्ये आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक 

नवी देहली – इस्लामिक स्टेटने नाताळच्या काळात पाश्‍चात्त्य देशांत आक्रमण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या संघटनेचत आत्मघातकी मुसलमान तरुणांची भरती करण्यासाठी ‘टिक टॉक’ या ‘अ‍ॅप’चा वापर चालू केला आहे. यावर लहान व्हिडिओ प्रसारित करून त्याद्वारे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ‘टिक टॉक’वर इस्लामिक स्टेटने अनेक खाती बनवली आहेत.

१. एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार या व्हिडिओंपैकी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे, ‘‘नाताळ साजरा करणारे अल्लावर विश्‍वास ठेवत नाहीत आणि ते इस्लामची थट्टा करतात. हे अल्लाच्या सैनिकांनो, या धर्मद्वेषी लोकांचे रक्त सांडण्यासाठी स्वतःला सिद्ध करा.’’

२. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमावरील एका खात्यावर प्रसारित करण्यात आला होता, ज्याचा वापर इस्लामिक स्टेटचा प्रचार करण्यासाठी केला जात होता. हे खाते गेल्या १८ मासांंपासून कार्यरत असून अनेकांकडून ते सहस्रो वेळा पाहिले गेले आहे.