‘आझादीका अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत गोवा पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा विविध कला सादरीकरणाद्वारे सहभाग !

भारत शासनाच्या पुरातत्त्व सर्वेक्षण, गोवा विभागाच्या वतीने ‘आझादीका अमृत महोत्सवा’च्या अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांनी गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे सहभाग घेतला.

मूर्तीचोर आणि मूर्तीरक्षक !

भारतीय प्राचीन वारशांविषयी प्रेम, आदर आणि अस्मिता असणार्‍या कुमार यांच्यासारख्या सामान्य व्यक्तीने या वारशाच्या जतनासाठी भारतभर चळवळ उभारली. यासाठी त्यांनी दाखवलेली तळमळ, चिकाटी आणि घेतलेले परिश्रम हे कौतुकास्पद आहे

जिल्हाधिकार्‍यांनी विशाळगडावरील अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत !

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानंतर पुरातत्व विभागाने संबंधितांना विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा दिल्या. या नोटिसांचा कालावधी वर्ष नोव्हेंबर २०२१ मध्ये संपल्यावर पुढे काहीच कारवाई झाली नाही. गेल्या ९ मासांपासून पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे.

ज्ञानवापीतील शिवलिंगाची ‘कार्बन डेटिंग’ करण्यास न्यायालयाचा नकार !

पुरातत्व विभागाचा सल्ला घेण्याऐवजी मागणी फेटाळणे अयोग्य ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची मूर्तीसंवर्धन प्रक्रिया अवैध ! – शिवसेना

पुरातत्व विभागाने संवर्धनाच्या नावाखाली मूर्तीची तात्पुरत्या रासायनिक प्रक्रियेद्वारे डागडुजी केली. ही गोष्ट लाखो भाविकांच्या श्रद्धेला बाधा आणणारी आहे.

प्राचीन‌ जगदंबा मंदिर वाचवण्‍यासाठी पोखरापूर ग्रामस्थांचे पुण्‍यात जागरण आंदोलन !

प्राचीन मंदिर, वास्तू जतन करण्याचे दायित्व पुरातत्व विभागाचे असतांना यासाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे लज्जास्पद !

रामायण-महाभारत शोधणारे प्रा. लाल !

सध्याच्या पुरातत्वज्ञांनी प्रा. लाल यांचा संदेश कृतीत आणल्यास जी दु:स्थिती पुरातत्व विभाग आणि प्राचीन स्थळे यांची झाली आहे, ती पुन्हा कधी न होता, भारताचा प्राचीन गौरवशाली वारसा, प्रगल्भ हिंदु संस्कृती यांचे दर्शन जगाला होऊ शकेल !

विशाळगडावरील अतिक्रमण न हटवल्यास मनसे पद्धतीने काढून टाकू ! – युवराज काटकर, मनसे जिल्हाउपाध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरातत्व विभागाच्या निषेधार्थ आंदोलन !

‘हिंदुद्वेष्टा’ पुरातत्व विभाग !

संतप्त ग्रामस्थांनी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. हिंदूंच्या सहिष्णु वृत्तीचा अपलाभ घेण्याचा पुरातत्व विभागाने प्रयत्न करू नये. याउलट सर्वांना समान नियम लावून त्यानुसार कार्यवाही करण्याची तत्परता दाखवावी, हीच अपेक्षा !

कुतुबमिनारच्या जमिनीवरील दावेदाराच्या याचिकेला पुरातत्व विभागाचा विरोध

देहलीतील कुतुबमिनार परिसरातील हिंदू आणि जैन मंदिरांच्या जीर्णोद्धाराशी संबंधित प्रकरणातील कुंवर महेंद्र ध्वज प्रसाद सिंह यांच्या हस्तक्षेप याचिकेला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने विरोध केला आहे.