(म्हणे) ‘धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद कोरोनापेक्षाही गंभीर !’  

हिंदु कट्टरतावादी असते, तर हा देश केव्हाच ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झाला असता, इस्लामी देशाप्रमाणे अल्पसंख्यांकांना हद्दपार केले असते, ते तसे नसल्यामुळे श्रीराममंदिर, श्रीकृष्णजन्मभूमी आणि ज्ञानवापी मशीद यांसाठी वैध मार्गाने लढा देत आहेत !

हिंदुत्व सहिष्णू असल्यामुळे ओवैसींवर भारतात अद्यापपर्यंत आक्रमण झाले नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

हिंदुत्व हे कधीच कट्टर असू शकत नाही. हिंदुत्व हे सहिष्णू आहे. हिंदुत्वाने कधीच कुणावर आक्रमण केले नाही. त्यामुळेच भारतात सर्व धर्माचे लोक सुख आणि समाधानाने नांदत आहेत.

(म्हणे) ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी कायदा आणणे राज्यघटनाविरोधी !

राजस्थानचे काँग्रेसी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम ! मुसलमान हिंदु नाव धारण करत हिंदु तरुणींची फसवणूक करतात याला गेहलोत प्रेम समजतात का ? जर नाही, तर ते याच्या विरोधात तोंड का उघडत नाहीत ?

काँग्रेसचे ‘लव्ह जिहाद’वरील प्रेम जाणा !

राजस्थानचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणतात, ‘‘धार्मिक सौहार्द बिघडवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ या शब्दाची निर्मिती भाजपद्वारे करण्यात आली आहे. अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी कायदा आणणे हे राज्यघटनाविरोधी आहे.’’

राष्ट्रघातकी काँग्रेस !

भारत जिहादी आतंकवादाच्या विरोधात लक्ष्यभेद करण्याचे धाडस दाखवत नाही, हेच सत्य आहे. अर्जुनाला माशाचा डोळाच दिसत होता, आताच्या लोकांना केवळ मासाच दिसतो आणि त्यांचे बाण अन्यत्रच लागत आहेत. त्यामुळे जे साध्य करायचे आहे, ते होत नाही. ही स्थिती पालटली पाहिजे.

बॉलिवूडवाल्यांचे पाप !

सध्या बॉलिवूडमधील घराणेशाहीचे सूत्र उपस्थित झाले असून काही नामांकित घराण्यांवर टीकेची झोड उठली आहे. आता त्याही पुढे जाऊन बॉलिवूडमधील कलाकारांचे पाकची कुख्यात गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.शी संबंध असल्याचे आरोप होत आहेत.

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे माजी संचालक आकार पटेल यांच्या विरोधात तक्रार

देशात धर्मांधांकडूनच हिंदूंवर आक्रमण केले जात आहे, हे माजी संपादकही असणार्‍या आकार पटेल यांना दिसत नाही, असे कसा म्हणता येईल ? पटेल यांच्यासारखे हिंदुद्वेषी निधर्मी आणि धर्मनिरपेक्षतावादी जगामध्ये खोटी माहिती पसरवून भारताला अपकीर्त करत आहेत !

‘टिक-टॉक’वर बंदी घाला !

टिक-टॉक’ या चिनी ‘अ‍ॅप’वर बंदी घालण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वर्ष २०१६ मध्ये ‘बाईट डान्स टेक्नॉलॉजी’ या चिनी आस्थापनाने हे ‘अ‍ॅप’ बाजारात आणले. अल्पावधीतच ते जगभर लोेकप्रिय झाले.

‘शरीयत’चा मनमानीपणा रोखा !

जर शरीयतनुसार न्यायनिवाड्याची प्रक्रिया चालू करायची असेल, तर ‘भारतात हिंदु धर्मानुसारही न्यायनिवाडा केला जावा’, अशी मागणी हिंदुनी उद्या केली तर . . . ! सर्वांना समान वागणूक आणि अचूक न्याय मिळवून देणारी हिंदु धर्मातील न्यायप्रक्रिया म्हणूनच खर्‍या अर्थाने आदर्श मानली जाते. तिचा अवलंब होणे ही सध्याच्या काळाची आवश्यकता आहे.

उघड गुन्हा न दिसणार्‍या पोलिसांना तात्काळ निलंबित करा !

‘नागोठणे (रायगड) येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर येथील मशिदीतून घरीच नमाजपठण करण्याचे आवाहन करणारी उद्घोषणा करण्यात आली.