हिंदुत्व सहिष्णू असल्यामुळे ओवैसींवर भारतात अद्यापपर्यंत आक्रमण झाले नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

नागपूर – हिंदू (हिंदुत्व) सहिष्णू आहेत म्हणूनच एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी भारतात काहीही बोलू शकतात. त्यांच्यावर आक्रमण होत नाही. यावरून हिंदूंची (हिंदुत्वाची) सहिष्णुता दिसून येते, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील प्रचारसभेत फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले की, हिंदुत्व हे कधीच कट्टर असू शकत नाही. हिंदुत्व हे सहिष्णू आहे. हिंदुत्वाने कधीच कुणावर आक्रमण केले नाही. त्यामुळेच भारतात सर्व धर्माचे लोक सुख आणि समाधानाने नांदत आहेत.

याच सभेत माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीजदेयक सूत्रावरून राज्य सरकारला लक्ष्य केले. राज्य सरकारने वीजदेयक माफ करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू, असे बावनकुळे यांनी सांगितले.