(म्हणे) ‘धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद कोरोनापेक्षाही गंभीर !’  

माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांचे फुत्कार  !

  • धार्मिक कट्टरता ही हिंदूंनी नाही, तर धर्मांधांनी स्वातंत्र्यापूर्वीपासून जोपासली आहे आणि जोपासत आहे. त्यांच्यामुळेच देशाची फाळणी झाली आहे आणि काश्मीरमधून हिंदूंचा वंशसहार होऊन त्यांना पलायन करावे लागले आहे. आजही देशात हिंदूंवर धर्मांधांकडून आक्रमणे होत असतात, ही वस्तूस्थिती असून त्याविरोधात हिंदू जागृत होत आहेत, त्याला आक्रमक राष्ट्रवाद म्हणणे हा शुद्ध कांगावा आहे, हे लक्षात येते !
  • या देशामध्ये जी काही धर्मनिरपेक्षात टिकून राहिली आहे, ती केवळ हिंदूंमुळे आहे, हे अन्सारी यांनी नेहमीच लक्षात ठेवायला हवे. हिंदु कट्टरतावादी असते, तर हा देश केव्हाच ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झाला असता आणि या देशातून अल्पसंख्यांकांना हद्दपार करण्यात आले असते, जसे इस्लामी देशात केले जाते; मात्र हिंदू तसे नसल्यामुळे आजही ते श्रीराममंदिर, श्रीकृष्णजन्मभूमी आणि ज्ञानवापी मशीद यांसाठी वैध मार्गाने लढा देत आहेत !

नवी देहली – कोरोना संकटापूर्वी भारतीय समाज धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद या कोरोनापेक्षाही गंभीर आजारांना बळी पडला आहे, असे विधान माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी केले आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचे नवे पुस्तक ‘द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग’च्या डिजिटल प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने अन्सारी बोलत होते.

अन्सारी पुढे म्हणाले की,

१. आज देश अशा ‘प्रकट आणि अप्रकट’ विचारसरणीमुळे धोक्यात दिसत आहे. ‘आम्ही आणि ते’च्या काल्पनिक सूत्रांवरून काही जण देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. (देशाला विभागण्याचे पाप हिंदूंनी नाही, तर कट्टरतावादी मुसलमानांनी पाकिस्तानची निर्मिती करून आधीच केले आहे. त्याविषयी अन्सारी तोंड का उघडत नाहीत ? – संपादक)

२. धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद या दोन्हींच्या तुलनेत ‘देशप्रेम’ ही अधिक सकारात्मक संकल्पना आहे; कारण ही सैन्य आणि सांस्कृतिक रूपात संरक्षणात्मक आहे. (असे आहे, तर किती देशप्रेमी अल्पसंख्यांक देशावर आघात होतात, तेव्हा देशाच्या मागे खंबीरपणे उभे रहातात ? त्याउलट जिहादी आतंकवाद करणारे किती देशद्रोही अल्पसंख्यांक आहेत, हे अन्सारी का सांगत नाहीत ? – संपादक)

३. ४ वर्षांच्या अल्प कालावधीत भारताने एक उदार राष्ट्रवादाच्या दृष्टीकोनाकडून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या राजकीय गृहितकापर्यंत प्रवास केला आहे. (जो अन्याय गेल्या ७० वर्षांत सांस्कृतिक राष्ट्रवादावर झाला तो अन्याय आता दूर केला जात असल्याने अन्सारी यांना पोटदुखी होणारच ! – संपादक)

(म्हणे) ‘वर्ष १९४७ मध्ये आम्ही द्विराष्ट्रवाद नाकारत पाकमध्ये गेलो नाही !’ – फारुख अब्दुल्ला

द्विराष्ट्रवादाला नाकारण्यासाठी नाही, तर नेहरूंनी काश्मीर आंदण दिल्यामुळे अब्दुल्ला कुटुंब पाकमध्ये गेले नाहीत, हे सत्य आहे; मात्र स्वतःला भारतीय दाखवण्यासाठी अब्दुल्ला खोटे बोलत आहेत, असेच लक्षात येते !

या कार्यक्रमाच्या वेळी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला उपस्थित होते. ते म्हणाले की, वर्ष १९४७ मध्ये आमच्याकडे पाकिस्तानमध्ये जाण्याची संधी होती; परंतु माझ्या वडिलांनी आणि इतरांनी हाच विचार केला की, दोन राष्ट्रांचा सिद्धांत आमच्यासाठी योग्य नाही. देशाला ज्या पद्धतीने पहाण्याची इच्छा आहे ती सध्याच्या सरकारला कधीही मान्य होणार नाही.