‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे माजी संचालक आकार पटेल यांच्या विरोधात तक्रार

अमेरिकेतील कृष्णवर्णियांप्रमाणे भारतातील मुसलमान, मागासवर्गीय आदींनी आंदोलन करण्याची चिथावणी दिल्याचे प्रकरण

  • अमेरिकेतील कृष्णवर्णियांवर अत्याचार होत आहेत. त्यातून त्यांचा उद्रेक होऊन त्यांनी कायदा हातात घेत हिंसाचार केला आहे; मात्र भारतात मुसलमान, मागासवर्गीय आदींवर असा कोणताही अत्याचार होत नसतांना त्यांना हिंसाचार करण्याची चिथावणी देणार्‍यांच्या विरोधात आतापर्यंत गुन्हा नोंद होऊन त्यांना अटकच झाली पाहिजे होती !
  • देशात धर्मांधांकडूनच हिंदूंवर आक्रमण केले जात आहे, हे माजी संपादकही असणार्‍या आकार पटेल यांना दिसत नाही, असे कसा म्हणता येईल ? पटेल यांच्यासारखे हिंदुद्वेषी निधर्मी आणि धर्मनिरपेक्षतावादी जगामध्ये खोटी माहिती पसरवून भारताला अपकीर्त करत आहेत !
आकार पटेल

बेंगळुरू – अमेरिकेत पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूनंतर अनेक शहरांमध्ये हिंसाचार झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, ‘आपल्या देशामध्ये मागासवर्गीय, मुसलमान, आदिवासी, गरीब आणि महिला यांच्याकडून अशी आंदोलने होणे आवश्यक आहे’, असे ट्वीट करणारे ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे माजी संचालक आकार पटेल यांच्या विरोधात येथे पोलिसांकडूनच तक्रार करण्यात आली आहे. पटेल यांनी ३१ मे या दिवशी वरील ट्वीट केले होते.

‘आंदोलन करणे ही कला असून जग त्याची नोंद घेईल,’ असेही पटेल यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले होते. पटेल यांच्या या विधानातून समाजातील विशिष्ट घटकांस सरकारविरुद्ध चिथावणी देण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारवर ‘अ‍ॅम्नेस्टी’चे विद्यमान संचालक अविनाश कुमार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘पटेल हे राज्यघटनेने त्यांना दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा वापर करत आहेत. (अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काहीही बडबडणे अथवा मनमानीपणे लिहिणे किंवा बोलणे नव्हे, हे अविनाश कुमार लक्षात घेतील का ? – संपादक) पोलिसांनी त्यांच्या अधिकारांचा अपवापर पटेल यांना त्रास देण्यासाठी करू नये.’