राज्यात १२ घंट्यांत ३ सहस्र ६२ खासगी बसगाड्यांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई !

केवळ एका दिवसात अशी कारवाई न करता प्रादेशिक परिवहन विभागाने नियमितपणे नियमांचे वारंवार उल्लंघन करणार्‍या खासगी बसगाड्यांवर अशी कारवाई केली असती, तर त्यांनी नियमांचे उल्लंघन केले नसते. 

३१ जानेवारीला गुन्हा केल्यावर आणि गुन्हेगार महाराष्ट्राबाहेर गेल्यावर ४ दिवसांनी पकडण्यासाठी पथके स्थापन करणारे महाराष्ट्र सरकार !

शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तो सध्या महाराष्ट्रात नाही. त्याला पकडण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

उत्तरप्रदेशातील मदरशांना मिळणार्‍या सरकारी निधीतील घोटाळ्याची चौकशी होणार !

मदरशांना देण्यात येणारा सरकारी निधीच बंद का करत नाही ?

साहाय्यक नद्यांतील दूषित पाणी नर्मदा नदीत मिसळू देणे देशासाठी घातक ! – द्वारका आणि ज्योतिष पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती  

शहरांतील नाल्यांचे पाणी नदीमध्ये सोडले जाते याचे दायित्व सरकार आणि स्थानिक प्रशासन यांचे आहे. नर्मदेला आम्ही ‘आई’ मानतो आणि प्रत्येकाची तिच्यावर श्रद्धा आहे.

नगरसेवक अण्णा लेवे यांचे आरोप तथ्यहीन ! – नगराध्यक्षा माधवी कदम

केवळ विहित माहिती दिली नाही म्हणून प्रशासन भ्रष्टाचारात बरबटलेले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कोरोना काळातील खरेदीविषयीची माहिती एक नगरसेवक किंवा विश्‍वस्त म्हणून अण्णा लेवे यांनी घेणे महत्त्वाचे होते.

पाकिस्तान वर्ष २०२१ पाळणार ‘गाय वर्ष’ !

नुसते ‘गाय वर्ष’ पाळण्याऐवजी गोहत्या होणार नाहीत, यासाठी पाकने प्रयत्न केले म्हणजे मानता येईल !

सांगली महापालिकेच्या पुस्तक बँकेला राजेश नाईक फाऊंडेशन वाचनालयाकडून १०१ पुस्तकांची भेट

फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि विमा सल्लागार संदीप आपटे यांचा विमा व्यवसायातील उत्तम कामगिरीविषयी आयुक्त कापडणीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उद्योगपती अदानी शरद पवार यांच्याकडे येऊन गेल्यानंतर सरकारने वीज देयक माफ न करण्याचा निर्णय घेतला !

वीज देयक माफ न करण्याचा निर्णय वीज आस्थापनांसमवेत चर्चा झाल्याशिवाय झाला नसेल. काही तरी लेनदेन झाल्याशिवाय हे झाले नसेल. सर्व आस्थापनांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोपही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी केला.

केंद्रीय अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला दिलासा, मूलभूत प्रश्‍न दुर्लक्षित राहिल्याची उद्योजकांची खंत

दळणवळण बंदी शिथिल झाल्यानंतर उद्योगाला गती मिळाली आहे; परंतु कापूस, सुताचे चढे भाव आणि कापडाला अपेक्षित न मिळणारी किंमत यामुळे एकूणच या क्षेत्रातील उलाढाल अल्प होत आहे.