सांगली महापालिकेच्या पुस्तक बँकेला राजेश नाईक फाऊंडेशन वाचनालयाकडून १०१ पुस्तकांची भेट

सांगली, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने चालू केलेल्या पुस्तक बँक अभियानास राजेश नाईक फाऊंडेशन वाचनालय, यांच्या वतीने महापालिका आयुक्त आयुक्त नितीन कापडणीस यांना माजी नगरसेवक राजेश नाईक यांच्या हस्ते १०१ पुस्तके भेट देण्यात आली. या वेळी दिव्यांग सुरेश भंडारे यांना राजेश नाईक फाऊंडेशनच्या वतीने सायकल भेट देण्यात आली. फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि विमा सल्लागार संदीप आपटे यांचा विमा व्यवसायातील उत्तम कामगिरीविषयी आयुक्त कापडणीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.