३१ जानेवारीला गुन्हा केल्यावर आणि गुन्हेगार महाराष्ट्राबाहेर गेल्यावर ४ दिवसांनी पकडण्यासाठी पथके स्थापन करणारे महाराष्ट्र सरकार !

गृहमंत्री अनिल देशमुख

शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तो सध्या महाराष्ट्रात नाही. त्याला पकडण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ३ फेब्रुवारी २०२१ या दिवशी माध्यमांशी बोलतांना दिली.

३१ जानेवारी २०२१ या दिवशी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेत हिंदु धर्माच्या विरोधात प्रक्षोभक आणि जातीय तेढ निर्माण करणारे भाषण केल्याच्या प्रकरणी सीएएवरून झालेल्या दंगलीतील सध्या जामिनावर असलेला आरोपी आणि हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याच्याविरुद्ध खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.