एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असलेला काळाबाजार हे रेल्वे यंत्रणेतील बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे लक्षण आहे. या प्रकरणी कारवाई करतांना काळाबाजार रोखण्यासाठीही केंद्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी ठोस भूमिका घ्यावी.
मुंबई – दळणवळण बंदीच्या काळात वैयक्तिक ‘ई-मेल आय.डी.’चा उपयोग करून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या तिकिटांचा काळाबाजार करणार्या ४६६ दलालांवर रेल्वे सुरक्षादलाकडून कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या दलालांकडून २ कोटी ७८ लाख रुपयांची १४ सहस्र ३४३ तिकिटे कह्यात घेण्यात आली आहेत. यामध्ये मुंबईतील २६२ दलालांचा समावेश आहे.