देहलीला जातांना कोरोनाचा नकारात्मक अहवाल आवश्यक !

नवी देहली – देहली सरकारने पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या ५ राज्यांतून येणार्‍या नागरिकांकडून कोरोनाचा नकारात्मक (निगेटिव्ह) अहवाल असल्यावरच देहलीत प्रवेश करू देण्याचा निर्णय घेतला आहे.

२६ फेब्रुवारीपासून या निर्णयाची कार्यवाही केली जाणार असून १५ मार्चपर्यंत हे लागू असणार आहे.